देऊळगाव राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा”

 

देऊळगाव राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा

बुलडाणा,(जिमाका),दि.20 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव राजा तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावाचे आयोजन केले आहे.  सोमवार दि.  23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा येथे तर दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता देऊळगाव राजा हायस्कुल ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

सदर दोन्ही मेळाव्यास जिल्ह्यातील १० वी, १२ वी, आयटीआय पदवी, पदविका पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहुन मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपुर प्राचार्य यांनी केले आहे.00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी