संग्रामपुर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे
“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
मेळावा”
बुलडाणा,(जिमाका),दि.20 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,
मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामपूर तालुक्यात मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण मेळावा चे आयोजन केले आहे. मंगळवार
दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संग्रामपुर येथे तर दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी
11 वाजता वरवट बकाल ता. संग्रामपुर जि. बुलढाणा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
आहे.
सदर दोन्ही मेळाव्यास जिल्ह्यातील
१० वी, १२ वी, आयटीआय पदवी, पदविका पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित
राहुन मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपुर प्राचार्य
यांनी केले आहे.00000
Comments
Post a Comment