आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 27 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 27 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


बुलडाणा,(जिमाका),दि.25 :  शिक्षणाचा हक्क अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 मध्ये निवड यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना प्रवेशासाठी दि. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन 2009 नुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.   प्रक्रियेअंतर्गत लॉटरी पद्धतीने निवडपात्र ठरलेल्या तिसऱ्या फेरी (प्रतिक्षा यादीतील) बालकांना शाळेमध्ये प्रवेशासाठी दि. 14 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.  शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या निर्देशानुसार प्रतिक्षा यादीतील चौथ्या फेरीमध्ये बालकांना प्रवेश देण्यासाठी दि. 27 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली असून, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. तरी जिल्ह्यातील यादीमध्ये नाव असलेल्या बालकांच्या पालकांनी विहीत मुदतीत तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे संबधित शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रबेश अंतीम करावा. मुदतीनंतर प्रवेशाबाबत विचार केल्या जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. प्रवेशासाठी आवश्यक कादपत्रांची यादी https://student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी आरटीई 2024-25 वर्षातील प्रकियेत सहभागी होऊन आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेमध्ये जावुन करुन घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाचेवतीने करण्यात आले आहे. याबाबत काही अडचण असल्यास पोर्टलवर दिलेल्या हेल्पनलाईन क्रमांकावर तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. 

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या