Wednesday, 18 September 2024

मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

 

मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतुक मार्गात बदल;

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका),दि.17 : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि. 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा शहराकडे मलकापूर, नांदुरा, धाड व चिखली कडून येणारी सर्व वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

बुलढाणा शहराकडे येणारी जड वाहतुकीमुळे अपघात किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मलकापूर, नांदुरा, धाड व चिखली कडून येणारी सर्व वाहतुक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

मलकापुर व मोताळा कडून येणारी वाहतुक नांदुरा-खामगाव-चिखलीमार्गे जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच नांदुरा कडून येणारी वाहतुक खामगांव-चिखलीमार्गे-जालना या पर्यायी मार्गाने, चिखली कडुन येणारी वाहतुक चिखली-खामगांव-नांदुरा मलकापूर या पर्यायी मार्गाने तर धाड व अजिंठा कडुन येणारी व मलकापूरकडे जाणारी वाहतुक धाडनाका-सरक्युलर रोड-त्रिशरण चौक ते चिखली किंवा खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.  

00000

No comments:

Post a Comment