जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांची यादी जाहिर; हरकती मागविल्या

 

जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांची यादी जाहिर; हरकती मागविल्या

 

बुलडाणा,(जिमाका),दि.30 : जिल्हा परिषदेंतर्गत सन 2024 वर्षाची अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारीत यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास दि. 7 ऑक्टोंबरपर्यंत सादर करावे लागणार आहे.

 

जिल्हा परिषदेच्या zpbuldana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती ज्येष्ठता यादीवर संबंधितांकडून दि. 7 ऑक्टोंबरपर्यंत लेखी आक्षेप मागविण्यात आले आहे. तसेच अनुकंपाधारक उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेत वाढ झाली असल्यास शैक्षणिक वाढीचे कागदपत्रे दिलेल्या कालावधीत सादर करावे. तसेच सदर तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप असल्यास विहित मुदतीत लेखी सादर करावे. आक्षेपांच्या पडताळणीनंतर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती यादी अंतिम करण्यात येणार आहे. याची अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या