मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा

 मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा


बुलडाणा,(जिमाका),दि.25 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर जि. बुलडाणा येथे प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. तसेच त्याचे वय 18 ते 35 वर्ष असणे गरजेचे आहे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण व कमाल पदव्युत्तर पदवीधारक असावा. उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य व्ही.बी. शिरसाट यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या