मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण; संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण;

संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील

 

बुलढाणा, दि.19(जिमाका) : बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात संत आणि महापूरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवारत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई, महात्मा ज्योतिबा फुले व






सावित्रीबाई फुले, संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज, शासकीय विश्रामगृह जवळील वसंतराव नाईक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, तहसील चौकातील नरवीर तानाजी मालुसरे आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे, कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे, जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, शहिद जवान युध्द स्मारकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या सर्व संत-महापुरुषांची स्मारके ही आपल्या सर्वांना आजही प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील. या संत-महापुरुषांचे पुतळे हे भावी पिढीला समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश  देतील.

            यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष, व आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री संजय गायकवाड, संजय रायमुलकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, श्रीमती श्वेता महाले, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

00000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या