महिला सशक्तिकरण कार्यक्रमाकरिता
येणाऱ्या वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था
बुलडाणा,(जिमाका),दि.18 : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व शहरातील विविध विकासकामांचा
लोकार्पण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. कार्यक्रमाकरिता
तालुका स्तरावरुन येणाऱ्या बसेस, खाजगी वाहने व शासकीय अधिकारी,कर्मचारी यांचे वाहनांची
पार्किंगची व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहे.
एस.टी. बसेसची पार्किंग व्यवस्था: चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांवराजा,
खामगांव, शेगांव तालुक्यातील वाहनांसाठी पार्किंग डी.एड. महाविदयालय सर्क्युलर रोड
लगतचे मैदान,त्रिशरण चौक बुलढाणा येथे. बुलडाणा, मोताळा, मलकापुर, नांदुरा, जळगांव
जामोद, संग्रामपुर तालुक्यातील वाहनांसाठी जिजामाता महाविद्यालय मैदान, बुलडाणा.
खाजगी वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था : बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार,
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, खामगांव, शेगांव तालुक्यातील वाहनासाठी डी.एड महाविद्यालयाचे,
देवीचे मंदीर बाजुचे मैदान येथे तर मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगांव जामोद, संग्रामपुर
तालुक्यातील वाहनासाठी आयटीआय कॉलेजच्या बाजुकडील
प्रांगणात येथे करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment