Monday, 30 September 2024

उत्सव साजरा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे

 उत्सव साजरा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे


 बुलडाणा,(जिमाका),दि.30 :  आगामी सन उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक विशस्त व्यवस्था अधिनियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सण उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त दु.के. साहू यांनी केले आहे. 


महाराष्ट्र सार्वजनिक विशस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41-क अन्वये दुर्गाउत्सव ,जयंती उत्सव व इतर उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक परवानगी अर्ज धर्मादाय आयुक्त यांच्या www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावा. अर्ज करण्याची पध्दत, अपलोड करावयाची कागदपत्रांची यादी इत्यादी माहिती वेबसाईटवर मार्गदर्शक सदराखाली ४१-क परवानगी या शिर्षकात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे-  ठरावाची प्रत, जागा मालकाचे ना-हरकत पत्र, पत्याचा पुरावा म्हणून लाईट बिलची मूळ प्रत व आधारकार्डची प्रत असणे आवश्यक(सबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद यांची परवानगी).  पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र(आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इ.), मागील वर्षाचा हिशोब, मागील वर्षी घेण्यात आलेल्या परवानगीची प्रत, परवानगी मिळणेकरिता वरिल कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर विहित कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज केल्यास परवानगीची प्रत ई-मेलव्दारे प्राप्त होण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्यास त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

000000

No comments:

Post a Comment