सेस फंड योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

सेस फंड योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

बुलडाणा, दि. 17 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे सेस फंड योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी व महिला लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे दि.9 ऑक्टोंबर2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी व महिला लाभार्थ्यांनी परीपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रासह संबंधीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावेत.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या