होमगार्ड पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे
आवाहन
बुलडाणा,(जिमाका),दि.20 : जिल्हा
होमगार्डतर्फे पुरूष व महिलांसाठीच्या रिक्त जागांची सदस्य नोंदणी प्रक्रिया नुकतीच
झाली. त्यात पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, निवड
झालेल्या उमेदरांनी मुळ कागदपत्रासह पुरुष उमेदवारांनी दि. 21 सप्टेंबर रोजी तर महिला
उमेदवारांनी दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 2 यावेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन
जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.
उमेदवारांची
तात्पुरती यादी maharashtracdhg.gov.in/maharashtracdhg.gov.in.mahahg/
enrollmentadd.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ठेवण्यात आलेली प्रतिक्षा यादी ही
दि. 31 मार्च 2025 पर्यंत वैध राहिली. त्यानंतर यादी संपुष्ठात येईल. तसेच प्रतिक्षा
यादीतील समान गुण असणाऱ्या उमेदवारांना त्याच्यावयाच्या जेष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात
आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व पोलीस चारीत्र पडताळणी करण्यात
येईल. यामध्ये अपात्र असल्याचे दिसुन आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र
केले जाईल,याची नोंद घ्यावी.तरी निवड झालेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्र व हमीपत्र
भरण्यासाठी दिलेल्या तारखेस जिल्हा होमगार्ड कार्यालय, बुलडाणा येथे उपस्थित राहावे.
000000
Comments
Post a Comment