आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन;
जिल्ह्यातील
31 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
बुलडाणा,(जिमाका),दि.19 : कौशल्य विकास
संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा. या दृष्टीकोनातून
राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून
महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन
कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य
चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातील 31 महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या या केंद्रांचा
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शुक्रवार दि. 20 सप्टेंबरला ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून
मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सदर
योजनेअंतर्गत 1. राजमाता व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सिंदखेडराजा
2. राजीव गांधी आर्ट अँड सायन्स कॉलेज सिंदखेडराजा
3. पैनगंगा नर्सिंग कॉलेज
येलगाव 4. स्किल पॅरामेडिकल
कॉलेज बुलढाणा 5. गुंजकर कॉलेज नांदुरा 6. गुरुकुल चित्रकला महाविद्यालय बुलढाणा 7. अनुराधा कॉलेज
ऑफ फार्मसी चिखली 8. गुरुकुल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी बुलढाणा 9. प्रबोधन विद्यालय
व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा 10. के बी जे आयटीआय
बोराखेडी 11. माऊली ग्रुप
ऑफ इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड
टेक्नॉलॉजी शेगाव 12. अनुदित उच्च महाविद्यालय आश्रम शाळा येळगाव 13. कुलस्वामिनी जुनिअर
कॉलेज पिंपळगाव देवी 14. राजे छत्रपती
जुनियर कॉलेज धामणगाव बढे 15. राजे छत्रपती
उच्च माध्यमिक विद्यालय जयपुर 16. चक्रधर स्वामी
आर्ट्स ज्युनिअर कॉलेज मड 17. संत गजानन
महाराज नर्सिंग स्कूल शेगाव 18. राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
खामगाव 19. स्वर्गीय दयासागर जी महाले प्रायव्हेट आयटीआय उदयनगर 20. न्यू सिटीजन टेक्निकल
इन्स्टिट्यूट बुलढाणा 21. विश्व कौशल्य
एम्पॉवरमेंट प्रायव्हेट आयटीआय बुलढाणा 22. सौ मालतीताई ठाकरे
जुनिअर कॉलेज नांदुरा 23. सहकार महर्षी
भास्करराव शिंगणे आर्ट्स कॉमर्स कॉलेज खामगाव 24. स्व प्रकाशभाऊ बावस्कर
महाविद्यालय सावळी 25. अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली 26. PRMSS अनुराधा
कॉलेज ऑफ फार्मसी 27. झेड ए उर्दू जुनियर कॉलेज मलकापूर 28. सावळे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज खामगाव 29. खामगाव पॅरामेडिकल कॉलेज
खामगाव 30. पुंडलिक महाराज महाविद्यालय
नांदुरा 31. गावंडे कॉलेज
ऑफ फार्मसी साखरखेर्डा अशा एकूण 31 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
सुरू होणार आहेत.
महाराष्ट्र
राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी
यासंदर्भात सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्राचार्यांना
पत्र पाठविले आहे. प्रत्येक केंद्रात आवश्यक बाबींची पूर्तता करावी.
महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधून हा
उद्घाटन कार्यक्रम यशस्वी होईल, या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचनाही दिली.
मा. पंतप्रधान
मोदीजी यांची 20 सप्टेंबर रोजी वर्धा येथील
स्वावलंवी शाळेच्या प्रांगणात जाहीर सभा घेणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री
विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांच्याशी संवाद साधणार
आहेत. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन व यशस्वी महिला
स्टार्टअप्सचा सन्मान तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन
उद्घाटन या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश या कार्यक्रमात राहणार आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून
योजनेचा लाभ घ्यावा. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या
कार्यक्रमाला त्या-त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी आभासी पद्धतीने जास्तीत
जास्त उमेदवारांनी सहभाग घेऊन उद्घाटन सोहळा पार पाडावा, असे आवाहन मा.जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी
केले.
याबाबत अधिक माहितीसाठी श्री.प्रविण खंडारे,सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता केंद्र बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment