रविवारी शौर्य दिनाचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका),दि.25 : जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे रविवार, दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विरमाता, विरपिता यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्यीत शिरून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने माजी सैनिक, शहिद जवानांच्या विरपत्नी, विरमाता, विरपिता आणि शौर्य पदकधारकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी दि 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचा कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे.
00000
No comments:
Post a Comment