मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

 

बुलडाणा,(जिमाका),दि.18 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार, दि. 19 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे हे गुरुवार, दि. 19, 2024 रोजी दूपारी 12.20 वाजता एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यस्थळी प्रयाण करतील. दुपारी 12.30 वाजता बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 1.15 वाजता मोटारीने शारदा ज्ञानपीठ हायस्कुल, बुलढाणाकडे प्रयाण करुन दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व इतर महापुरुष व संतांचे पुतळयाचे ई अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहतील. स्थळ- शारदा ज्ञानपीठ शाळेचे मैदान, बुलढाणा. दुपारी 3.30 वाजता मोटारीने एमएसआरटीसी वर्क शॉप मागील हेलीपॅड बुलढाणाकडे प्रयाण करुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या