समाजकल्याण कार्यालयातील साहित्य खरेदीची ई-निवीदा प्रसिद्ध

 समाजकल्याण कार्यालयातील साहित्य खरेदीची ई-निवीदा प्रसिद्ध


बुलडाणा,(जिमाका),दि.25 :  जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाच्या मुल्यमापन, संनियंत्रण व डाटा एंट्री (0.5%) योजनेअंतर्गत समाजकल्याण कार्यालय, बुलडाणा येथे साहित्य खरेदीची ई-निवीदा जेम पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. साहीत्य घेण्यास इच्छुक संस्थानी जेम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. 


 ऑल इन वन कॉम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर व झेरॉक्स मशिन इत्यादी साहित्य तसेच जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांना अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी डिजीटल स्टँडी पुरविण्यासाठी जेम पोर्टलवर ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर साहित्याविषयी विस्तृत माहिती व अटी शर्ती जेम पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या