दक्षता व भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा
बुलडाणा,(जिमाका),दि.25 : जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुवार, दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता घेण्यात येणार आहे.
जिल्हा दक्षता समिती सभा तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा यात ज्या व्यक्तींना तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञालेखासह तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समिती समोर दाखल करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या तहसिलदार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment