मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलढाणा येथे आगमन व स्वागत

         बुलडाणा,(जिमाका),दि.19 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज बुलढाणा येथील एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅड येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.

             यावेळी आयुष व आरोग्य, कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधानसभा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय रायमुलकर, तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानवंदना देण्यात आली.

            महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रस्थान झाले.

                                                   000000

Comments