Posts

२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड

Image
  •            १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह; युवकांच्या सहभागातून जनजागृतीवर भर                             •        १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’                             •        ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन बुलढाणा दि. 12 (जिमाका): माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. राज्यातील नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’, तर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभिय...

महाडिबीटी अर्ज नोंदणीबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मार्गदर्शन

Image
    बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाडिबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील 190 महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांना अर्ज नोंदणी प्रक्रियाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.   महाडिबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ६ जुलै २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालयांच्या प्राचार्य तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे १९० महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.   कार्यशाळेत महाडिबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व माग...

पालक अधिकारी डॉ. संतोष कडले यांची आरोग्य संस्थांना भेट; ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

Image
    बुलढाणा दि. 11 (जिमाका): पालक अधिकारी जिल्हा बुलढाणा तथा प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर डॉ. संतोष कडले यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंढेरा तसेच ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.   यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही आढावा घेण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच आरोग्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.   भेटीदरम्यान विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, रुग्णसेवा, औषधसाठा, स्वच्छता, गुणवत्ता व्यवस्थापन आणि उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्...

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस बुलढाण्यात ३६० शासकीय व खासगी कार्यालयांची तपासणी; १७ कार्यालयांना नोटिस

  बुलढाणा दि. 11 (जिमाका): महिलांना कार्यस्थळी लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी लागू असलेल्या पॉश ॲक्ट, 2013 मधील तरतुदींची तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याची राज्यभर तपासणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत जून २०२६ पासून राज्यातील शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची ४ हजारांहून अधिक तपासणी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत राज्यात ३ हजार ५७९ शासकीय आणि ३ हजार २९६ खासगी कंपन्या व कार्यालये, अशा एकूण ६ हजार ८७५ ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कायद्यातील तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या २९४ शासकीय आणि ३७८ खासगी कार्यालयांना, अशा एकूण ६७२ कार्यालयांना जिल्हास्तरावरून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्या कार्यालयांनी विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न केल्यास पॉश ॲक्ट मधील तरतुदींनुसार ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी (पॉश ॲक्ट,2013) आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात येत आहे. बुलढाण्यात ...

शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा दि. 11 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जांची छाननी १ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, पहिली निवड यादी ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ आहे. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड २१ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, दुसरी निवड यादी ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात एकूण १०० जागा उपलब्ध असून, त्यापैकी इतर मागा...

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

  बुलढाणा दि. 11 (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, नागरिकांना उत्तम ग्रंथालयीन सेवा आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार ” तसेच “ डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार ” दिला जातो. सन २०२५-२६ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह,...

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

  बुलढाणा, दि. ११ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाबाबत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणे व वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर निर्धारित संख्येपेक्षा अधिक मतदार असल्यास आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांचे विभाजन करून नवीन मतदान केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदान केंद्र त...