उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : माहे एप्रिल ते जून 2025 दरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सुधारित शिबिर दौरा जाहिर करण्यात आला आहे. नागरिकांनी तालुका स्तरीय शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : मे महिण्यात मेहकर येथे 8 व 30, देऊळगाव राजा येथे 13 व 27, लोणार येथे 14 व 29, चिखली 16 व सिंदखेड राजा येथे 23 मे रोजी तर जुन महिण्यात मेहकर येथे  4 व 19, देऊळगाव राजा येथे 10 व 26, लोणार येथे  12 व 27, चिखली येथे 16  व सिंदखेड राजा येथे 23 जून रोजी होणार आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहायक रोखपाल हजर राहणार आहेत. 

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या