खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

 खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश इच्छुक दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन सतगुरू श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगांवचे प्राचार्य व्हि.व्हि. काळे यांनी केले आहे.

दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यानी Admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन पदधतीने अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवुन झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित करावा.  त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येते. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसायाची माहीती देण्यात येते.

सतगुरू श्री अगाशे काका औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव या संस्थेमध्ये एकुण 20 व्यवसाय प्रवेशाकरीता उपलब्ध असुन प्रवेशाकरीता एकुण 680 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली असुन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना लागु करण्यात आलेली आहे. आयटीआयतुन व्यावसायीक शिक्षण पुर्ण करून त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या