पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 2 जूनपर्यंत आमंत्रित

 

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 2 जूनपर्यंत आमंत्रित

बुलडाणा दि. 7 (जिमाका): पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर अनुदानावर विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी दि. 2 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन , असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अमितकुमार दुबे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी केले आहे.

            राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया चालू वर्षात राबविली जाणार आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत 3 मे पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 2 जूनपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. दि. 25 ते 27 जून या कालावधीत लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता केली जाईल. 2 जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी अर्जासोबत स्वतःचा मोबाइल नंबर द्यावा. त्याच मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर, त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS या ॲप्लिकेशनद्वारे भरता येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या