जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा; फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

 




जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;

फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

         बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृह येथे जिल्ह्यातील तालुक्यांनिहाय महसूलविषयक कामांचा आढावा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिन गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार केले जात आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया ही संथ असून ती वेगवान करावी. यासाठी तलाठी व सीएससी केंद्रामार्फत विशेष मोहिम राबवावी. शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी महाराजस्व अभियानाची परिपूर्ण अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार कार्यवाही करुन सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

बैठकीमध्ये विविध विषयाचा आढावा घेऊन ध्वजदिन निधीचे दिलेले उद्दिष्टे प्रत्येक तालुक्याने निर्धारित कालावधी पूर्ण करावे. ई-चावडी प्रणाली, ई फेरफार प्रणालीचा आढावा यावेळी घेतला. शासनाने प्रत्येक तालुका, गावपातळीवर शेतकरी व नागरिकांचे समस्या निकाली काढण्याकरीता 1 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत महाराजस्व अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्याने नियोजन करुन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या