शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

 




कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कौशलेद्र कुमार सिंह यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

सहकार आणि पणन विभागाने सावकारांकडे अडकलेली शेतकऱ्यांची जिल्ह्यामध्ये एकूण 72.25 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिली. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे, आणि आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे यासाठी हे अभियान महत्वपूर्ण असल्याचे यावेळी हेलोंडे पाटील यांनी सांगितले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या विकासासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री किंवा जोड व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग यावर भर द्यावा. पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाही जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग यांनी मिळून नियोजन करावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आज आढावा बैठकीत दिले.

 

बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शेतकरी आत्महत्या झालेल्या पात्र वारसांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, वन्य प्राण्यांपासून शेती पिक नुकसान भरपाई, रेशीम लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना अशा विविध योजनाचा आढावा घेऊन चर्चा केली. तसेच कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत विशेषत: आत्महत्या केलेल्या कुटूंबाला मिळेल यांची खात्री करावी.  जिल्ह्यातील सर्व विभागांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करावे,असे निर्देश ॲड. हेलोंडे पाटील यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या