मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी

 

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह;  खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी मोताळा संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी  के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी मोताळा येथे करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगारीला मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.

प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केले असून नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजन केले आहे. या मेळावाद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याव्दारे उपलब्ध होणार आहे.

दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली असूननन पात्र, गरजू व नौकरी इच्छुक उमेदवारांनी दि. 27 मे रोजी के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी, ता. मोताळा जि. बुलढाणा येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी  करावी. उपस्थित कंपन्याच्या प्रतिनीधी समवेत मुलाखत द्यावी. तसेच शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता सुध्दा मुलाखत देऊ शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या