पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील गोधणखेड गावासाठी टँकर मंजूर

 

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील गोधणखेड गावासाठी टँकर मंजूर

 

    बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील गोधणखेड गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

 

गोधणखेड येथे 230 पशुधन व 330 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 14 हजार लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या