9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

 9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 9 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.

        देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत शुक्रवार, दि. 6 जून 2025 पर्यंत पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या