मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

 

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा जि.बुलढाणा येथे प्रवेश सत्र 2025-26 करीता वायरमन फिटर, आयसीटीएसएम, प्लंबर, वेल्डर, कोपा, शिवणकाम (ड्रेसमेकिंग), ब्युटी पार्लर (कॉस्मोटोलॉजी) या एक व दोन वर्षीय 240 जागेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेले आहे.

प्रवेश अर्ज https:admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.  संपुर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र संस्थेत रोज सुरू आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केलेले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या