मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

 मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा पावसाळी प्रजनन हंगाम जून 2025 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने मत्स्यकास्तकार,शेतकरी व सहकारी संस्थांनी मत्स्यबीजाची मागणी लेखीस्वरुपात नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु.ग. गावडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था/ मत्स्यकास्तकार/ शेततळीचारक/ मत्स्योद्योजक/ निलक्रांती योजना, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गतचे मत्स्यसंवर्धन तळीधारक लाभार्थी यांनी त्यांचे तलाव / शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी मत्स्यजीरे, अर्धबोटुकली, मत्स्यबोटकली, मत्स्यबीजाची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच नि.मा.साळुंके सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र कोराडी ता.मेहकर यांचेकडे संपर्क करुन (मो.नं ९८६०८०९७११) मागणी लेखीस्वरुपात नोंदविण्यात यावी.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या