खाजगी आस्थापनांनी शी-बॉक्स प्रणालीवर नोंदणी करावी

 

खाजगी आस्थापनांनी शी-बॉक्स प्रणालीवर नोंदणी करावी

  बुलढाणा,दि.19 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शी-बॉक्स ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीवर सर्व खाजगी आस्थांपनानी नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक खाजगी आस्थापनांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. यासाठी खाजगी आस्थापनांनी कार्यालयात गठीत केलेली तक्रार निवारण समितीची नोंदणी शी-बॉक्स प्रणालीवर (SHE BOX PORTAL) करण्याचे केंद्र शासनाने निर्देश आहे.

            अशी करा नोंदणी : शी-बॉक्स अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन होम पेजवर अंतर्गत तक्रार समिती Private Head Office Registration या टॅबवर क्लिक करुन माहिती या टॅबवर दिलेल्या सूचना वाचून संपूर्ण माहिती भरुन सबमीट करावी.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या