जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

बुलढाणा,दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.

 

            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

            महाराष्ट्र दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडू, अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या