उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबीर 15 मेपासून; खेळाडू व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

 

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबीर 15 मेपासून; खेळाडू व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

            बुलडाणा, (जिमाका) दि. 07 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेयांचे मार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र बुलडाणा तसेच जिल्ह्यातील विविध एकविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे दि.15 ते  24 मे  2025 या कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये विविध क्रिडा व आरोग्य विषयक तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा खेळाडू, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

 शिबिरांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा व जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 6 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 7 या दोन सत्रामध्ये हॅण्डबॉल, फुटबॉल, खो-खो, मैदानी व बॉक्सिंग, इ. खेळाचे तसेच व्यक्तीमत्व विकास शिबीराअंतर्गत वक्तृत्वस्पर्धा, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, योगा, एरोबिक्स, लाठीकाठी, कराटे, दंतचिकीत्सा, खेळ दुखापत व प्रथमोपचार, आहार विषयक माहिती देण्यात येणार आहे.

शिबीराला उज्वला लांडगे  रा.क्री.मा. (हॅण्डबॉल), जीवन मोहाड रा.क्री.मा. (फुटबॉल) व विविध एकविध खेळ संघटनेचे तज्‍ज्ञ मार्गदर्शक करतील.  शिबीरामध्ये शहरातील वयोगट 12 ते 17 वर्ष मुले-मुली यांना सहभागी होऊ शकतात. नियमित उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंना कार्यालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीकरीता उज्वला लांडगे  रा.क्री.मा. (हॅण्डबॉल) 9७६४७३२७६८, श्री.जीवन मोहाड रा.क्री.मा. (फुटबॉल) ९४०५७३४४०३  यांचेशी संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या