फलोत्पादन योजनासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

 

फलोत्पादन योजनासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2025-26 अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरीता विविध घटकांतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. संत्रा पुर्नज्जीवन, ड्रगन फ्रुट, अंळबी बिज उत्पादन केंद्र स्थापन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, हरीतगृह, यांत्रिकिकरण, पॅक हाऊस, शितगृह, रेफर व्हॅन, कांदाचाळ इत्यादी बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे :  लाभार्थीच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे, (७/१२ मध्ये फळपिकाची नोंद असणे आवश्यक), ८ अ नमुना, आधार कार्ड छायांकीत प्रत, आधार लींक बँक पासबुकची छायांकीत प्रत, आधार लींक मोबाईल नंबर, शेतकरी ओळखक्रमांक अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर नोंद करण्यात यावी. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क करावा.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या