Posts

नशामुक्त युवा, विकसित भारत संकल्पनेवर जिल्हास्तरीय युवा महोत्सव 26 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात आयोजन; 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी

Image
      बुलढाणा, दि. 23 (जिमाका) : युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासह राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि मेरा युवा भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे हा महोत्सव होणार आहे.   यावर्षी महोत्सवाची ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही संकल्पना असून, त्याअंतर्गत विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. जानेवारी 2027 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.   महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींना आपली कला, प्रतिभा आणि...

शासकीय आयटीआय चिखली येथे दीक्षांत समारंभ; गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव

Image
    बुलढाणा, दि. २३ (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिखली येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, आयएमसी अध्यक्ष सुधीरभाऊ तांबट, आयएमसी सदस्य भिकाजी पाटील, प्रा. मिलिंद हिवाळे, नगरसेवक विजय वाळेकर, सिद्धू ठेंग तसेच संस्थेचे प्राचार्य आर. टी. शेगोकार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.   मान्यवरांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना दीक्षांत समारंभाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेत प्रगती साधावी, अशा उद्देशाने हा समारंभ आयो...

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील निंबा गावासाठी टँकर मंजूर

Image
  बुलढाणा दि.23 (जिमाका):   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील निंबा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   निंबा येथे 979 पशुधन व 619   लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 31 हजार 540 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील लोणीकाळे गावासाठी टँकर मंजूर

Image
          बुलढाणा दि.23 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील लोणीकाळे गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   लोणीकाळे येथे 574 पशुधन व 1372 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 35 हजार 400 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पुन्हा संधी; ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरण्याचे आवाहन

  विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार नोंद असलेल्या मतदारांना दिलासा   बुलढाणा दि.23 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ (SIR-2026) अंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र नागरिकांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.   या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून, गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करणे ही प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान, तर गणना प्रपत्रांची डिजिटायझेशन प्रक्रिया १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच नोटीस टप्पा व दावे-हरकतींचा निपटारा ३१ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर; ASDD मतदारांनी यादी तपासावी

    बुलढाणा दि. 23 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ (SIR-2026) राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांची पडताळणी आणि मतदार यादी पुनरीक्षणासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.   या कार्यक्रमानुसार गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, गणना प्रपत्रे (EFs) निकाली काढण्याची प्रक्रिया १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादीचे प्रकाशन २२ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे.   ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, अशा ASDD मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच गणना प्रपत्र व त्यामागील परिशिष्टातील माहिती वस्तुस्थितीनुसार भरून घेण्यात येणार आहे.   बुलढाणा जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी...

*समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी*

*समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी* अमरावती दि.२२ : समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे आयोजन रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती (समक्ष) व  संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय (व्ही.सी. द्वारे) येथे करण्यात आले आहे.  या अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय...