Posts

8 ऑक्टोंबरला महसूल लोकअदालत; प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा * शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा

  बुलढाणा, दि. ५ (जिमाका) : बुलढाणा उपविभागांतर्गत बुलढाणा व चिखली तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे, वाद तसेच अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. या अनुषंगाने बुलढाणा तालुक्यातील नागरिकांसाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे, तर चिखली तालुक्यातील नागरिकांसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, चिखली येथे महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये महसूल प्रकरणे, अर्ज, महसूल न्यायालयासंदर्भातील दावे, वाद तसेच अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित नागरिकांनी आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा किंवा तहसील कार्यालय, चिखली येथे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचा तातडीने व तडजो...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा ; अंबिया बहार २०२६-२७ साठी आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व संत्रा पिकांचा समावेश

  बुलढाणा, दि. ५ (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२६-२७ मध्ये अंबिया बहारासाठी आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आणि संत्रा या सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. फळपीक विमा योजनेच्या अंमलबजावणीस २७ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, अतिवृष्टी, वेगवान वारे, दैनंदिन कमी तापमान तसेच गारपीट यांसारख्या हवामान धोक्यांपासून निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे, तसेच फळपीक नुकसानीच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे, हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिकांची लागवड करणारे, कुळाने, भाडेतत्त्वावर किंवा पट्ट्याने शेती करणारे शेतकरीदेखील या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार आहे. योजनेत सहभागी हो...

बुलडाणा अर्बनची यशोगाथा आता विशेष टपाल आवरणावर

Image
    बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तसेच बुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या गौरवार्थ भारतीय डाक विभागाच्या वतीने विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले.    बुलडाणा अर्बन येथील गोवर्धन हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याला बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, उपाध्यक्ष श्री. विनोदजी केडिया, संचालक गोपाल चिरानिया, नागपूर क्षेत्राचे सहाय्यक निदेशक डाक सेवा जयंत दाऊ, बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   सन १९८६ मध्ये केवळ १२ हजार रुपये प्रारंभिक भांडवल आणि ७२ सभासदांच्या सहभागातून सुरू झालेल्या बुलडाणा अर्बनने चार दशकांत व्यापक विस्तार साधला आहे. आज संस्थेचे चार राज्यांत ४८३ शाखांचे जाळे असून ४१० गोदामांची व्यवस्थाही आहे. आर्थिक क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने तिरुपती, अयोध्या, माहूरगड, शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापूर येथे भक्तनिवास उभारले आहेत.   ...

#बुलढाणा सेवा संकल्प अभियान अंतर्गत रायपूर येथे पोषण महा

#बुलढाणा  सेवा संकल्प अभियान अंतर्गत रायपूर येथे पोषण महा   #सेवासंकल्पअभियान२०२६  #सेवासंकल्पअभियान

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी*

Image
*सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी* *बुलढाणा, दि. ४ (जिमाका) :* सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या उपक्रमाद्वारे आयुष्यमान आरोग्य मंदिर, कोद्री अंतर्गत ३० वर्षे व त्यावरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांची रक्तदाब, रक्तशर्करा, वजन तसेच आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. उपकेंद्र सोनाळा अंतर्गत मौजे सालवान येथेही सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून लसीकरण तसेच ‘तिशीचा पल्ला – आरोग्य तपासणी आणि सल्ला’ व ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांची उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. मोबाईल व्हॅनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोडे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. त्यांच्या पथकाकडून ...

सेवा संकल्प अभियानातून धानोरा येथे विवाह व मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप*

Image
*सेवा संकल्प अभियानातून धानोरा येथे विवाह व मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप* *बुलढाणा, दि. 4 (जिमाका) :* सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामपंचायत धानोरा (वि.) यांच्या वतीने ग्रामस्थांना आवश्यक नागरी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे संबंधित लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली असून, विविध शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सुलभ झाले आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना विविध नागरी सेवा अधिक गतिमान व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. 0000

सेवा संकल्प अभियानांतर्गत खैरा येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद**७५ नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामस्थांचा मोठा सहभाग*

Image
*सेवा संकल्प अभियानांतर्गत खैरा येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* *७५ नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामस्थांचा मोठा सहभाग* *बुलढाणा, दि. ४ (जिमाका) :* सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खैरा येथे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व आवश्यक उपचाराच्या उद्देशाने आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुलढाणा येथील डॉ. अभिलाष माळी (MBBS, MS – General Surgery) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान गावातील सुमारे ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आरोग्यविषयक तक्रारींबाबत नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. अभिलाष माळी यांचा सत्कार डॉ. अनंत मापारी यांच्या हस्ते, तर रविंद्र सूर्यवंशी यांचा सत्कार श्री. लहुजी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थां...