Posts

महात्मा जोतीराव फुले-द्विशताब्दी जन्मवर्ष,

Image
  महात्मा जोतीराव फुले-द्विशताब्दी जन्मवर्ष, #महात्मा_फुले #बुलढाणा #सामाजिक_समता #स्त्री_शिक्षण #सत्यशोधक_समाज

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर आयोजन; पात्र मतदारांनी गणना प्रपत्र दाखल करण्याचे आवाहन

    बुलढाणा दि. 26 (जिमाका) : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR-2026) अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, २८ आणि रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.   या विशेष मोहिमेअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या प्रवर्गातील पात्र मतदारांना मतदार यादीत आपले नाव कायम ठेवण्यासाठी किंवा नोंदविण्यासाठी गणना प्रपत्र (EF) दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे मतदारांना गणना प्रपत्र सादर करता येणार आहे.   विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येत आहे. प्राप्त झालेली गणना प्रपत्रे १० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार असून, मतदार यादीचे अंतिम प्रकाशन २२ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.   तरी जिल्ह्यातील संबंधित पात्र मतदारांनी २८ व २९ नोव्हेंबर र...

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा ; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Image
    बुलढाणा, दि. २६ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिन साजरा   करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासाहित निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, सुरेश थोरात, अजिंक्य घोडगे, सदाशिव शेलार, सुवासिनी गोणेवार तहसीलदार वृषाली केसकर, संजीवनी मुफडे नायब तहसीलदार प्रमोद करे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.                                                    ००००

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ नोव्हेंबरला मेहकर(जि. बुलढाणा दौऱ्यावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद; विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

    बुलढाणा दि.26 (जिमाका): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मेहकर येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद मेळावा, सेवासंकल्प अभियान तसेच विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार, छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने दुपारी १.४५ वाजता मेहकर येथील हेलिपॅडवर आगमन. दुपारी २ वाजता मेहकर येथील डी. पी. रोडवरील रिलायन्स मॉलसमोर आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा व सेवासंकल्प अभियानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता हेलिकॉप्टरने संभाजीनगर विमानतळाकडे रवाना होतील. 00000

बुलढाण्यात प्रथमच अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा प्रारंभ; रोबोटिक सर्जरीसह एनएबीएल कार्यशाळेचे आयोजन

    •           २७ व २८ नोव्हेंबरला आरोग्यविषयक विविध उपक्रम •            २२ वैद्यकीय महाविद्यालयांतील १५० डॉक्टरांचा सहभाग   बुलढाणा, दि. २६ (जिमाका) : केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय विविध भव्य वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जिल्ह्यात प्रारंभ होणार असून, पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया, एनएबीएल कार्यशाळा आणि दोन दिवसीय २ डी इको शिबिर हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या वैद्यकीय उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये एनएबीएल कार्यशाळा, रोबोटिक सर्जरी तसेच २ डी इको शिबिराचा समावेश आहे. राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ; खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व दिव्यांग खेळाडूंना संधी

  बुलढाणा,दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षांच्या पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक पात्र खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू व व्यक्तींसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. शासन निर्णय दिनांक 29 डिसेंबर 2023 व 25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची सुधारित नियमावली 2023 निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार...

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील उटी गावासाठी टँकर मंजूर

  बुलढाणा दि.26 (जिमाका):   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील उटी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली. उटी येथे 1040 पशुधन व 3365   लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 83 हजार 900 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील वरवंट गावासाठी टँकर मंजूर

    बुलढाणा दि.26 (जिमाका):   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील वरवंट गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   वरवंट येथे 1200 पशुधन व 2850   लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 1 लाख लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन

  जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन #बुलढाणा #पिक विमा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

महात्मा जोतीराव फुले - द्विशताब्दी जन्मवर्ष,शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे जन्मलेले महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राच्या समाजसुधारक चळवळीचे आद्य प्रणेते आहेत.२०२७ हे त्यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष #महात्माफुले200 #महाज्योती

Image
 

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते ३.३० या वेळ

              बुलढाणा दि.२५ (जिमाका): समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे आयोजन रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती (समक्ष) व   संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय (व्ही.सी. द्वारे) येथे करण्यात आले आहे.             या अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियो...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती समृद्ध करा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव दुष्काळी परिस्थितीत हळद व पीक व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा शेतकऱ्यांशी संवाद

    बुलढाणा, दि. २५ (जिमाका): बदलत्या हवामान परिस्थिती आणि दुष्काळाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक व्यवस्थापनावर भर द्यावा. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती अधिक समृद्ध करावी. येणारा काळ हा शेतजमीनधारक शेतकऱ्यांचा असून, योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून अधिक उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.   दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हळद पिकाचे प्रभावी व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि हवामानातील बदलांनुसार शेतीचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून २४ नोव्हेंबर रोजी मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.   मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. नितेंद्र कदम यांनी दु...

बुलढाण्यात आता रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते २८ नोव्हेंबरला रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन

      •           मुंबई, नागपूर, पुणे व छत्रपती संभाजीनगरनंतर बुलढाण्यात अत्याधुनिक सुविधा •            उद्घाटनाच्या दिवशीच होणार पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया   बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बुलढाण्यातही उपलब्ध होणार आहे. राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेसाठी बुलढाणा येथे पाच रोबोटिक युनिट प्राप्त झाले असून, उद्घाटनाच्या दिवशीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य सेवेत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.   केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांनंतर आता बुलढाणा येथेही रोबोटिक शस्त्रक्रिये...

कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार बुलढाणा जिल्ह्यात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा

    बुलढाणा, दि. २५ (जिमाका) :   कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेची सुविधा जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.   कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून त्यामध्ये पुरुषांचाही समान सहभाग महत्त्वाचा आहे. कुटुंबाचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि माता-बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आरोग्य विभाग व जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे.   पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समाजात असलेले गैरसमज व भीती दूर करून पुरुषांमध्ये जनजागृती करणे, कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच पात्र लाभार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून ...

सेवा सप्ताहानिमित्त जानेफळ येथे रक्तदान शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; स्वतः केले रक्तदान

    बुलढाणा, दि. २५ (जिमाका) :   केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात आयोजित सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे यांनी जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली.   आगामी जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना विविध आरोग्य सेवांचा लाभ मिळावा, यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.   सेवा सप्ताहांतर्गत जानेफळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज ठाकरे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदान शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 000000

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील पाथर्डी गावासाठी टँकर मंजूर

  बुलढाणा दि.25 (जिमाका):  पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील पाथर्डी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली. पाथर्डी येथे 1582 पशुधन व 1180  लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 74 हजार 880 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000 

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील बोथा गावासाठी टँकर मंजूर

    बुलढाणा दि.25 (जिमाका):   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील बोथा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   बोथा येथे 655 पशुधन व 1180   लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 38 हजार 800 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

➡️ महात्मा ज्योतिराव फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली

Image
➡️ महात्मा ज्योतिराव फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली  #महात्मा_फुले #बुलढाणा #सामाजिक_समता #स्त्री_शिक्षण #सत्यशोधक_समाज

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम

Image
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम  #बुलढाणा  #MahatmaPhule200  #महात्माफुले200  #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी

    अमरावती दि.23 : समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे आयोजन रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती (समक्ष) व   संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय (व्ही.सी. द्वारे) येथे करण्यात आले आहे.   या अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी,निर्धारित वेळेपुर्वी १ ...