DIO BULDANA NEWS 29.09.2023

 सेवा पंधरवड्यानिमित्त गांधी जयंतीदिनी विशेष स्वच्छता मोहीम

बुलडाणा, दि. २९ : सेवा पंधरवडानिमित्त दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंती दिनी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत यांनी विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छता मोहीम राबविताना प्लॅस्टिक व सुका कचरा संकलन व त्याची विल्हेवाट ओला व सुका कचरा वर्गीकरण करून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत रस्ते, क्रिडांगणे, खुली जागा व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय आणि परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 
या विशेष स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000
'आयुष्यमान आपल्या दारी'मध्ये ३ लाख १८ हजार ९३४ कार्ड वाटप
*मोबाईल अॅप व्दारे ई-कार्ड काढणे शक्य
बुलडाणा, दि. २९ : आयुष्यमान आपल्या दारी उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ८ लाख ६२ हजार २३७ पात्र लाभार्थी आहेत. यापैकी ३ लाख १८ हजार ९३४ लाभार्थींना कार्डवाटप करण्यात आले आहे. याची एकूण टक्केवारी ही ३७ टक्के आहे. पात्र लाभार्थ्यांना आता मोबाईल अॅप व्दारे ई-कार्ड करता येणार आहे.
अँड्रॉइड मोबाईलमध्ये आयुष्मान भारत ॲप्लिकेशन डाऊनलोड करून स्वतःचे ई-कार्ड स्वतः तयार करणे शक्य झाले आहे. याबाबत पात्र लाभार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत मोबाईल ॲप डाऊनलोड करून परिचित सर्वांच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून खात्री करावी आणि केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
आधार क्रमांक, फॅमिली आयडी नंबर, नावाद्वारे पात्र लाभार्थी शोधून त्यांचे ई आरोग्य कार्ड काढणे शक्य आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी १८००१११५६५ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच मोफत उपचाराकरीता १८००२३३२२००, आभा कार्ड संदर्भात १८००११४४७७ संपर्क करावा.
जिल्हा ई-कार्ड वितरणामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, त्यानुसार आवश्यक सूचना जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामसभेत याबाबत नियमीत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
जिल्हा शून्य कुष्ठरोग संसर्ग ध्येय साध्य करणार
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. २९ : केंद्र शासनाने 2030 पर्यंत कुष्ठरोग या रोगाचा संसर्ग शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा या कामी प्रभावीपणे राबवून जिल्हा शून्य कुष्ठरोग संसर्ग करण्याचे ध्येय साध्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
देशातून देवी हा महाभयंकर रोग हद्दपार झाला आहे. कुष्ठरोगासारखे जुनाट रोग हद्दपार होत आहे. कुष्ठरोग हा एक त्वचारोग फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वी या रोगावर कोणताही उपचार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वाळीत टाकले, रोग्यांना विद्रुपता येणे असे प्रकार समाजामध्ये सर्रास होत होते.
सुरुवातीला एकच डापसोन औषध होते. नंतर आधुनिक शास्त्राच्या प्रगतीमुळे बहुविध औषधोपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे कुष्ठरोग बरा होऊ लागला आहे.
त्वरीत उपचारामुळे प्राथमिक स्तरावर निदान होऊन रुग्ण बिनाविकृती बरे होऊ लागले आहे. यासाठी कुष्ठरोग कार्यक्रमातील कुष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ११८ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्याचे दर दहा हजारामागे ०.४१ एवढे प्रमाण आहे.
सर्व स्तरावरील प्रयत्नामुळे देशातील कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. त्याची परिपूर्ती म्हणजे केंद्र शासनातर्फे शाश्वत विकास ध्येय अंतर्गत २०३० पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. 
राज्य हे आवाहन गावपातळीवर शुन्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणणार आहोत. यासाठी जिल्ह्यात कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथम जिल्हा, नंतर तालुका आणि गाव अशा पध्दतीने टप्प्याटप्याने शून्य कुष्ठरोग संसर्ग अभियान सर्व स्तरावर राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्याचा धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यामध्ये जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, मनुष्यबळ व अर्थिक मदत याचा विचार केला आहे. या पध्दतीने एकत्रित कार्य केल्यास ध्येय निश्चित साध्य होण्यास मदत होणार आहे. जिल्हा शून्य कुष्ठरोग संसर्ग ध्येय साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि सामाजिक बांधीलकी असलेल्या सर्व यंत्रणा, तसेच जनतेने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000

Comments