सिकलसेल रुग्णांनी मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घ्यावा जिल्हाकाऱ्यांचे आवाहन
बुलडाणा, दि.27 :- सिकलसेल हा आनुवंशीक आजार असून या आजाराच्या नियंत्रणासाठी
प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी सिकलसेल तपासणी करणे आवश्यक
आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य रुग्णालयात मोफत सिकलसेल तपासणी करण्यात येत
असून शासनामार्फत विविध लाभ सिकलसेल रुग्णांना दिला जातो. या सुविधाचा सिकलसेल रुग्णांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सिकलसेल आजार हा आनुवंशीक असल्यामुळे या आजारातुन
कोणत्याही सिकलसेल ग्रस्त रुग्ण व वाहक रुग्ण मुक्त होवू शकत नाही. वाहक व्यक्ती
तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये विवाह करु नये, असे विवाह झाल्यास येणारे मूल हे
सिकलसेल ग्रस्त असू शकते. अशावेळेस गर्भवती मातांनी 3 महिण्याच्या आत गर्भजल
परिक्षण करुन प्रसुतीबाबत डॉक्टरांच्या सल्लाने निर्णय घ्यावा. तसेच प्रत्येक मुलामुलींनी
सिकलसेल तपासणी नंतरच विवाह केल्यास या आजारावर नियंत्रण शकतो. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.
सिकलसेलचे लक्षणे
: रुग्णांमध्ये
वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे
दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, आहार घेणे व नियमित
फॉलिक ॲसिड गोळ्यांचे सेवण करणे गरजेचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी काळजी न घेतल्यास
आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी
डॉक्टरांच्या सल्लाने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी व काळजी घेणे गरजेचे असते.
सिकलसेल ग्रस्त रुग्णांना सर्व शासकीय जिल्हा रुग्णालय,
जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार दिले जातात. तसेच मोफत
दिव्यांग प्रामणपत्र, मोफत रक्तपुरवठा, गर्भजल परिक्षण बाबत माहिती, संजय गांधी
निराधार योजनेतंर्गत 1 हजार 500 रुपयांची मदत, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य
योजनेत मोफत उपचार, सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांना परिक्षेच्या वेळी एका तासाला
20 मिनिटे जास्त वेळेची सवलत, मोफत एसटी प्रवास सुविधा अशा सुविधा शासनामार्फत
उपलब्ध देण्यात येते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment