सफाई कर्मचाऱ्यांनी कर्ज योजनेसाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत
अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.20 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या
कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी दि. 31 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाईनव्दारे
अर्ज सादर करावे, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
मिलिंद धांडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सफाई
कर्मचाऱ्यांकरीता 81 कर्ज प्रकरणांचे भौतिक आणि 3 कोटी 70 लाख रुपये एवढ्या रकमेचे
आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत सादर करावेत.
31 ऑक्टोंबरनंतर पोर्टल बंद होणार असल्याने संगणकावर प्रस्ताव स्विकारणे बंद होईल.
तरी इच्छुक लाभार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment