विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी
27 ऑक्टोंबरला होणार प्रसिध्द
बुलडाणा (जिमाका) दि.25:- निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर
मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार शुक्रवार
दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी
सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहे. पुनरिक्षण
कार्यक्रमाअंतर्गत दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार
संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यास्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार
आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी
प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार
यांनी दिली आहे.
प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही. तसेच दि. 1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल, अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. नाव समाविष्ठ करणे, दुरुस्ती करणे, अस्पष्ट, चुकीचा फोटो, वय, पत्ता, नाव इत्यादी प्रकारची कामे या कालावधीत होणार आहे. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1950 वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व नागरीक व नवमतदारांनी या कालावधीत मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment