प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण; जिल्ह्यातील 16 केंद्रांचेही लोकार्पण
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण; जिल्ह्यातील 16 केंद्रांचेही लोकार्पण
बुलढाणा
दि. 19 (जिमाका):-ग्रामीण भागातील
तरुणांना रोजगार संधी व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य
विकास केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज
ऑनलाईन लोकार्पण झाले. जिल्ह्यातील 16 केंद्राचेही
लोकार्पण यावेळी झाले.
राज्यातील 511 ग्रामपंचायतींमध्ये
'प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे' लोकार्पण ऑनलाईन पद्धतीव्दारे झाले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह
येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित
पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा दूरदृश्य संवाद
प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच बुलडाणा
तालुक्यातील सागवान केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास आमदार
संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते,
उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
प्र.व. खंडारे, तहसिलदार रुपेश खंडारे आदी उपस्थित होते. या
कार्यक्रमास नागरिक व युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी
पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने
महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे,
असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी
रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी
जिल्ह्यातील 16 केंद्रांच्या ठिकाणी मान्यवर, नागरिक व युवकांचा उस्फुर्त
प्रतिसाद मिळाला.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने
राज्यातील 350 तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या
511 कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आज झाले. यामध्ये जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 16 केंद्राचे
लोकार्पण झाले. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील सागवान व सावळा, चिखली येथील आम्ररापूर,
देऊलगाव राजा येथील देऊलगाव माही, जळगाव जामोद येथील आसलगाव, खामगांव येथील सुताळा
बु. व घातपुरी, लोणार येथील सुलतानपूर, मलकापूर येथील दाताळा, मेहकर येथील दोनगाव,
मोताळा येथील धामणगाव बढे, नांदुरा येथील वडनेर भोलजी, संग्रामपूर येथील वरवट व सोनाळा,
शेगाव येथील जलंब, सिंदखेड राजा येथील साखर खेर्डा या कौशल्य विकास
केंद्रांचा शुभारंभ झाला.
0000
Comments
Post a Comment