उपलब्ध
पाणीसाठाचा वापर काटकसरीने करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा (जिमाका) दि.25:- जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस
झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मोठे व लघु प्रकल्पांचा संकल्पीत पाणीसाठा मर्यादीत
आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठाचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. किरण पाटील यांनी केले.
अत्यल्प पाऊस झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख मोठे तीन
प्रकल्पांचा संकल्पीत पाणीसाठा 222.69 द.ल.घ.मी पैकी आज दि. 25 ऑक्टोंबर रोजी
78.15 द.ल.घ.मी. (35 टक्के) आहे. लघु 41
प्रकल्पांचा संकल्पीत पाणीसाठा 103.61 द.ल.घ.मी पैकी 56.98 द.ल.घ.मी. (55 टक्के) असा
एकुण बुलडाणा जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा एकूण 467.99 द.ल.घ.मी.
संकल्पीत पाणीसाठा आहे. सध्या 224.78 द.ल.घ.मी (48 टक्के) पाणीसाठा प्रकल्पामध्ये
उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी नगर परिषद, ग्रामपंचायती
तसेच औद्योगिक वापराचे पाणी उपलब्ध पाणीसाठयातून वापरण्यात येतो. पाणीसाठा हा
मर्यादेत असून त्यांचा वापर सर्वानी काटकसरीने करावा. जेणे करुन उपलब्ध साठाचा
वापर पिण्याचे पाणी, उद्योग व शेतीसाठी वापर करता येईल. शेतकरी बांधवांनी रब्बी
हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकामध्ये मुख्यत: गहु, भुईमुंग, मका ही जास्त पाणी लागणारी पिके न घेता कमी
पाण्यावर येणारी चारा वर्गीय व हरबरा या पिकांची लागवडीचे नियोजन करावे.
सिचंनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा. पाण्याची बचत करुन जिल्हा प्रशासनास
सहाकार्य करावे.
00000000
Comments
Post a Comment