जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध
बुलडाणा,(जिमाका) दि.30 :-ग्रामविकास व पंचायतराज विभागातंर्गत जिल्हा परिषदेतील सरळसेवा भरती
प्रक्रियेव्दारे गट क संवर्गातील विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. कनिष्ठ
यांत्रिकी, यांत्रिकी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवार्गातील
पदांची परिक्षा गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून प्रवेशपत्र
ऑनलाईन उपलब्ध करुण देण्यात आले आहे. परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा
परिषद बुलडाणाच्या www.zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली
आहे. पात्र उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा
परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment