मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची
कडक अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा,
दि.26 :- जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी
कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने
विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत
जिल्हा दक्षता समिती सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डॉ.
पाटील यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यामध्ये पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक
अंमलबजावणी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना खबऱ्या
योजनेंतर्गत शासनाकडुन
एक लाख रुपये बक्षिस दिले जातात. या योजनेची सर्वसामान्यपर्यंत जनजागृती करावी. तसेच स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट,
नेहरु युवा केंद्र, एनएसएस, महिला बाल विकास कार्यालय, व्यसनमुक्ती केंद्र या सर्व
यंत्रणानी एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन करावे.
जिल्ह्यातील समुचित प्राधिकारी यांनी आपआपल्या
कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी
कायद्यानुसार बोर्ड, कायदा पुस्तिका, केंद्र नोंदणी प्रमाणपत्र, एफ-फॉर्म रजिस्टर,
ऑनलाईन एफ-फॉर्म, कलम 9 नुसार गर्भवती महिला नोंदणी रजिस्टर, संमतीपत्र इत्यादी
गोष्टींची सोनोग्राफी केंद्रधारक पुर्तता करतात किंवा नाही यांची काटेकोरपणे
तपासणी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रावर कायदेशिर कारवाई करावी, असे
निर्देश डॉ. पाटील यांनी दिले.
पीसीपीएनडीटी व एमटीपी संबधी तक्रारी नोंद्रविण्यासाठी
शासनाच्या टोल फ्री क्रमांक 18002334475 तसेच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 व पोलीस
मदत क्रमांक 100, 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.
पाटील यांनी केले.
000000000
Comments
Post a Comment