“कापूस पिकातील बोंड सड रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन”
बुलडाणा, दि. 11 : कापूस पिक सध्या फुले लागण्याच्या आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे.या काळात जास्त प्रमाणात पर्जन्यमान, किडींचा प्रादुर्भाव आणि दाट पेरणी किंवा झाडांची गर्दी या कारणामुळे बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून या रोगाचे नियंत्रण करावे.
रोगाची लक्षणे :
v हा रोग वातावरणात असलेल्या अनेक बुरशींमुळे होतो, ज्यामध्ये फुजारियम,अस्परजीलस, रायझोपस, कोलेट्रोत्रिकम,निमटोसपोर इ. बुरशीचा समावेश होतो.सुरुवातीला बोंडावर लहान ठिपके पडतात व कालांतराने ते वाढत जातात.
v नंतर या रोगाचा प्रादुर्भाव बोंडाच्या आतमध्ये पसरतो आणि बोंड आतमधून सडायला सुरुवात होते.
v बोंडे परिपक्व होण्याआधीच गळून पडतात.
एकात्मिक व्यवस्थापन:-
ü नत्रयुक्त खताचा संतुलित वापर
ü कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम१०ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
000000
“तूर पिकातील मररोग:एकात्मिक व्यवस्थापन”
बुलडाणा, दि. 11 : तूर हे राज्यातील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. राज्यात तूर पिक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव या अवस्थेत जास्त प्रमाणात उद्भवतो.तसेच फुलोरा ते शेंगा धरण्याच्या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास काही वेळेस शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून या रोगाचे नियंत्रण करावे.
रोगाची लक्षणे :
v हा रोग फ्युजारीअम उडम या बुरशीमुळे होतो.
v खोडावर जांभळट तपकिरी चट्टे दिसतात.
v पाने व फांद्या पिवळसर पडून संपूर्ण झाड वळते.
v झाड उपटून बुंध्याजवळ उभा काप घेतल्यास जल नलिका काळी पडलेली दिसते .
v मर रोगग्रस्त झाडे सहजासहजी उपटली जात नाही
एकात्मिक व्यवस्थापन:-
ü मर रोग प्रतिकारक्षम वाणांचीच लागवड करणे उदा. बिडीएन १३-४१( गोदावरी), बिडीएन ७११, बिएसएमआर ७३६, बिएसएमआर ८५३, बिडीएन ७१६ आणि जिआरजी-१५२ (भीमा).
ü पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम३७.५+ थायरम ३७.५ डब्लू .एस.टक्के या मिश्र बुरशीनाशकाची ४ ग्रम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
ü पहिले पिक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी.
ü मर रोग बाधित शेतातील तुरीच्या झाडाची मुळे शेतात गाडून न टाकता, गोळा करून नष्ट करावीत त्यामुळे रोगाचा दुय्यम प्रसार कमी होतो.
ü पिकाची फेरपालट करावी.
ü बिगर हंगामी पिकाची लागवड करू नये.
ü पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
ü शक्य होईल अशा शेतात अंतरप्रवाही बुरशीनाशकांची आळवणी/ड्रेंचिंग करावी उदा. १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करवी.
00000
“तूर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी - ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन”
बुलडाणा, दि. 11 : तूर हे राज्यातील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. राज्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकात उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्याअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत होऊ शकतो. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून या किडीचे नियंत्रण करावे.
किडींची ओळख:-
या किडीचा पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो. कोष गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.
नुकसानीचाप्रकार :
अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतुडून खातात. अळी लहान असतांना कळी फुलोऱ्यावर तर मोठी अळी मुख्यत: शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाने खाते.
एकात्मिक व्यवस्थापन:-
ü पिकात हेक्टरी १० कामगंध सापळे उभारावेत, यामुळे या अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणत नियंत्रण करण्यास मदत होईल.
ü पक्षांसाठी प्रती हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत.
ü सुरुवातीच्याकाळातप्रादुर्भा
ü घाटे अळीचा विषाणू (एच. ए. एन. पी.व्ही.) प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१ X १०९तीव्रतेचा) फवारावा.
ü आर्थिक नुकसान पातळी (१० -१५ % प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल१८.५ एस २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट ५ एस जी ४.४ ग्रॅम किंवालॅम्बडा-सायलोथ्रिन ५ ईसी १० मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ एस सी २ मिलीप्रती १० लिटर पाण्यात या रासायनिक कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा.
00000
Comments
Post a Comment