दिव्यांगाना
27 व 28 ऑक्टोबरला कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप
बुलडाणा,(जिमाका)
दि.23 : समाजकल्याण
विभाग व ॲलिम्को मुंबई यांचेमार्फत दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य
पुरविण्यासाठी दि. 1 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत बुलडाणा व खामगाव येथे तपासणी शिबीराचे
आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये खामगाव, मलकापूर, नांदूरा, शेगाव, जळगाव जामोद
व संग्रामपूर या भागातील तपासणी केलेल्या दिव्यांग व्यक्तीना साहित्य वितरीत करण्यात
येणार आहे. शिबीरात तपासणी केलेल्या दिव्यांग व्यक्तीनी साहित्य घेण्यासाठी दि. 27
व 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता अंध निवासी विद्यालय, धाड रोड बुलडाणा येथे उपस्थित
राहावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment