डॉ. रविंद्र मराठे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष पदी रुजू

 

डॉ. रविंद्र मराठे  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष पदी रुजू

 

बुलडाणा,(जिमाका) दि.20 :  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाव्दारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती जाहिर केली आहे. त्यानुसार अध्यक्ष पदावर डॉ. रविंद्र मराठे  व सदस्य पदावर जळगांव येथील कविता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मराठे व श्रीमती कविता चव्हाण यांनी दि. 10 ऑक्टोंबर 2023 रोजी पदभार स्विकारला असून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कामकाज नियमितपणे सुरु झाले आहे. तरी सर्व ग्राहक, पक्षकार, वकील यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे कळविण्यात आले आहे.   

00000

Comments