मेहकर तालुक्यात 26 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा

 

मेहकर तालुक्यात 26 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा

 

बुलडाणा,(जिमाका) दि.20 : मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा आणि स्वराज्य करियर अकादमी मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 26 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा स्वराज्य करियर अकादमी, सोनाटी  रोड, ता. मेहकर जि. बुलढाणा येथे होणार असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित राहून नोकरी मिळविण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.वा. खंडारे यांनी केले.    

 

श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत नॅशनल करियर सर्विसच्यावतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित करण्यात आले असून कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे पात्र इच्छुक उमेदवारांची मुलाखतीव्दारे प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.  पात्र व गरजु स्त्री-पुरुष उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतात.

 

दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर युवकयुवती उमेदवारांनी मॉडेल करीयर सेंटरच्या www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन गुरुवार दि. 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी मॉडेल करीयर सेंटर बुलडाणा यांच्या दूरध्वनी क्रमांक 242342 किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 वर संपर्क साधावा.

00000

Comments