चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

 

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

बुलढाणा,दि. 6 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली येथे आज दि. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला आमदार श्वेताताई महाले पाटील, अंकुशराव पाटील, आयएमसीचे उपाध्यक्ष अजित  कोठारी, कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. केदार ठोसर, प्रा. प्रशांत देशमुख, आयएमसी सदस्य मनोज सोनूने, भिकाजी पाटील, प्रशांतजी बोधेकर, मिलिंद हिवाळे, अमोल गवले, प्राचार्य श्री.बेदरकर, सागर पुरोहित यांची उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते यांनी डॉ. केदार ठोसर यांनी पर्यावरण संरक्षण तर प्रशांत देशमुख  यांनी सामाजिक समरसता या विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य बेदरकर यांनी केली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारंपरिक खेळ, पारंपरिक वेशभूषा यांचे सादरीकरण केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश घुगे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य तथा सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.  

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या