आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

 

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

बुलढाणा,दि. 18 (जिमाका) : आदिवासी विकास विभागातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत समाविष्ट योजनांसाठी आदिवासी बांधवांनी दि. 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी मोहनकमार व्यावहारे यांनी केले आहे.

या योजनांत 85 टक्के अनुदानावर वनहक्कधारक आदिवासी लाभार्थ्यांना काटेरी तार, आदिवासी शेतकऱ्यांना काटेरी तार, आदिवासी युवक-युवतींना पिठाची गिरणी, आदिवासी बेरोजगार युवक-युवतींना खाद्य स्टॉल, आदिवासी शेतकऱ्यांना पावर डिलर, महिला-पुरुष बचत गटांना खाद्य स्टॉल, होजिअरी गारमेंटसाठी अर्थसहाय्य आदींचा समावेश आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर दि. 15 जुलै 2025 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

सदर योजनांमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बदल करण्याचा व कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. तरी संबंधित जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर भेट देऊन आपले अर्ज तत्काळ सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाव्दारे  करण्यात आले आहे.

00000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या