बुलढाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन

 बुलढाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 02 : श्री. पलसिद्ध महास्वामी शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजक नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्यभिषेक साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते होणार आहे.

विद्यार्थ्यामध्ये नागरी कर्तव्य, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण या बाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे. तरी या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पलसिद्ध महास्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या